सोने खरेदीबाबत मोठा बदल, ‘हा’ हॉलमार्क ‘या’ तारखेपासून ठरणार अवैध, ग्राहकांची असुविधा टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय
भारत सरकारने सोने आणि दागिन्यांच्या खरेदी-विक्रीच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऋषभ | प्रतिनिधी

जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला ही बातमी माहित असणे आवश्यक आहे. सोने आणि दागिन्यांच्या खरेदी-विक्रीच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या मते, ३१ मार्च २०२३ नंतर, चार अंकी HUID हॉलमार्क असलेले दागिने विकता येणार नाहीत. त्याऐवजी, केवळ हॉलमार्क म्हणून 6-अंकी अल्फान्यूमेरिक क्रमांक असलेले दागिने विकले जाऊ शकतात.
आता ठरणार 4 अंकी हॉलमार्क असलेले सोने अवैध !
ग्राहक मंत्रालयाने सांगितले की, 4 आणि 6 अंकी हॉलमार्किंगच्या गोंधळाबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे. सोन्याच्या खरेदी-विक्रीच्या बदललेल्या नियमानुसार, आता फक्त 6 आकड्यांचे अल्फान्यूमेरिक हॉलमार्किंग वैध असेल. या नवीन हॉलमार्कशिवाय सोन्याचे दागिने विकले गेले तर ते वैध ठरणार नाही. मंत्रालयाने सांगितले की नवीन नियम लागू झाल्यानंतर 4 अंकी हॉलमार्क देखील पूर्णपणे बंद होतील.

HUID क्रमांकाबद्दल जाणून घ्या
हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) क्रमांक शुद्ध सोन्यावर किंवा त्यापासून बनवलेल्या कोणत्याही प्रकारच्या दागिन्यांवर बनवला जातो. हा HUID क्रमांक 6 अंकी अल्फान्यूमेरिक कोड आहे. जेव्हा ज्वेलर्स त्या दागिन्यांची माहिती BIS पोर्टलवर अपलोड करतात, तेव्हा या क्रमांकावरून तुम्हाला खरेदी केलेल्या दागिन्यांशी संबंधित माहिती मिळू शकते. सोन्याच्या फसवणुकीच्या प्रकरणांना बायपास करण्यासाठी असे कोड खूप प्रभावी आहेत.
