व्हिडिओकॉन कंपनीच्या चेअरमनला अटक, आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयची कारवाई

व्हिडिओकॉनचे संस्थापक वेणुगोपाल धूत यांना ICICI बँक कर्ज प्रकरणात सीबीआयने अटक केली आहे. यापूर्वी याच प्रकरणात आयसीआयसीआयच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक करण्यात आली होती.

ऋषभ | प्रतिनिधी

व्हिडिओकॉनचे संस्थापक वेणुगोपाल धूत यांना ICICI बँक कर्ज प्रकरणात सीबीआयने अटक केली आहे. याच प्रकरणात कारवाई करताना, CBI ने शुक्रवारी ICICI बँकेच्या माजी एमडी आणि सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना 2012 मध्ये व्हिडीओकॉन ग्रुपला बँकेने दिलेल्या कर्जामध्ये कथित फसवणूक आणि अनियमितता केल्याप्रकरणी अटक केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ICICI बँकेने व्हिडीओकॉन ग्रुपला 3,250 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते, त्यापैकी 86 टक्के रक्कम (सुमारे 2810 कोटी रुपये) परत केली नाही. 2017 मध्ये हे कर्ज NPA मध्ये टाकण्यात आले.

जाणून घ्या या पूर्ण प्रकाराची पार्श्वभूमी !

वेणुगोपाल धूत

वेणुगोपाल धूत यांचे नाव एफआयआरमध्ये आरोपी म्हणून होते

अधिकाऱ्यांनी सांगितले की, सीबीआयने चंदा कोचर, त्यांचे पती आणि व्हिडिओकॉन ग्रुपचे वेणुगोपाल धूत तसेच न्यूपॉवर रिन्युएबल्स, सुप्रीम एनर्जी, व्हिडिओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्यावर गुन्हेगारी कट आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याशी संबंधित आयपीसी कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. एफआयआरमध्ये आरोपी म्हणून मार्च 2018 मध्ये चंदा कोचर यांनी तिच्या पदाचा गैरवापर करून पतीला आर्थिक फायदा मिळवून दिल्याचा आरोपही करण्यात आला होता. आरोपांनंतर, चंदा यांनी ऑक्टोबर 2018 मध्ये ICICI बँकेच्या CEO आणि MD पदाचा राजीनामा दिला. 

धूत यांनी आयसीआयसीआय बँकेकडून मिळालेले कर्ज न्यूपॉवरमध्ये गुंतवले होते

2012 मध्ये व्हिडिओकॉन समूहाला ICICI बँकेकडून 3,250 कोटी रुपयांचे कर्ज मिळाल्यानंतर व्हिडिओकॉनचे प्रवर्तक वेणुगोपाल धूत यांनी NuPower मध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केल्याचा आरोप आहे. सीबीआयने 2019 मध्ये एफआयआर नोंदवल्यानंतर एका निवेदनात म्हटले होते की आरोपींनी आयसीआयसीआय बँकेची फसवणूक करण्याच्या गुन्हेगारी कटात खाजगी कंपन्यांना काही कर्ज मंजूर केले होते. मे 2020 मध्ये ईडीने चंदा कोचर आणि त्यांच्या पतीची कोट्यवधी रुपयांचे कर्ज आणि त्याच्याशी संबंधित इतर प्रकरणांमध्ये चौकशी केली होती. चौकशीनंतर ईडीने दीपक कोचर यांना अटक केली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!