तुम्हालाही जॉब सोडताना सतावतेय का ग्रॅच्युइटीची चिंता ? तपशीलवार जाणून घ्या ग्रॅच्युइटी कशी कैलक्युलेट करतात आणि इतर निगडित गोष्टीं

सध्या ग्रॅच्युइटी मिळवण्यासाठी एखाद्या व्यक्तीला खासगी कंपनी किंवा खासगी संस्थेत किमान पाच वर्षे काम करावे लागते. हा कालावधी संपल्यानंतर कर्मचाऱ्याला निश्चित रक्कम मिळते.  ग्रॅच्युइटीचे नेमके गणित काय हे सविस्तर जाणून घेऊया.

ऋषभ | प्रतिनिधी

Proposed Reforms to the Payment of Gratuity Act, 1972

बर्‍याच काळापासून, सरकार ग्रॅच्युइटीचे बंधन 5 वर्षांवरून 1 वर्षांपर्यंत कमी करण्याचा विचार करत आहे. तुम्ही सरकारी कर्मचारी असाल किंवा खाजगी कंपनीचे कर्मचारी, देशातील प्रत्येक नागरिकाला ग्रॅच्युइटीचा समान अधिकार आहे. हा नियम 1972 साली करण्यात आला होता, पण आजही देशातील बहुतांश लोकसंख्येला त्याची माहिती नाही. चला, आज आम्ही ग्रॅच्युइटीच्या नियमाबद्दल म्हणजे ग्रॅच्युइटीचे सूत्र आणि त्याचे फायदे याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

ग्रॅच्युइटी म्हणजे काय?

सध्या ग्रॅच्युइटी मिळवण्यासाठी एखाद्या व्यक्तीला खासगी कंपनी किंवा खासगी संस्थेत किमान पाच वर्षे काम करावे लागते. हा कालावधी संपल्यानंतर कर्मचाऱ्याला निश्चित रक्कम मिळते. ग्रॅच्युइटी हा पेन्शन किंवा भविष्य निर्वाह निधीचा (पीएफ) भाग नाही. त्यापेक्षा एकाच ठिकाणी पाच वर्षे सेवा केल्याचा तो पुरस्कार आहे, जो कर्मचाऱ्याला मिळतो. यातील काही भाग कर्मचार्‍यांच्या पगारातून कापला जातो, परंतु त्यातील बहुतांश रक्कम कंपनीच्या मालकाला द्यावी लागते.

पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी कायदा 1972

ग्रॅच्युइटीचा नियम “पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी कायदा, 1972” अंतर्गत करण्यात आला आहे. ज्या कंपन्यांमध्ये 10 पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत त्यांना हे लागू आहे. एखाद्या कर्मचाऱ्याने कोणत्याही कारणास्तव नोकरी सोडल्यास किंवा सेवानिवृत्त झाल्यास त्याला ग्रॅच्युइटीच्या अटींनुसार लाभ मिळतो.

payment of gratuity act 1972/Tamil/labour law - YouTube

ग्रॅच्युइटीची रक्कम कशी मोजली जाते?

ग्रॅच्युइटीच्या रकमेबद्दल जाणून घेण्यासाठी एक अतिशय सोपा फॉर्म्युला आहे.

एकूण ग्रॅच्युइटीची रक्कम = (शेवटचा पगार) x (15/26) x (कंपनीमध्ये काम केलेल्या वर्षांची संख्या). उदाहरणार्थ, समजा एका कर्मचाऱ्याने 20 वर्षे एकाच कंपनीत काम केले आहे. आणि कंपनी सोडताना त्याचा पगार दरमहा 75,000 होता. प्रत्येक महिन्यात चार रविवार असल्याने ग्रॅच्युइटीमध्ये फक्त २६ दिवस मोजले जातात. ग्रॅच्युइटीची गणना वर्षातील १५ दिवसांच्या आधारे केली जाते.

ग्रॅच्युइटीची एकूण रक्कम = (75000)x(15/26)x(20) = रु.865385. त्याचप्रमाणे, प्रत्येक कर्मचारी त्याच्या मूळ वेतनानुसार ग्रॅच्युइटी कैलक्युलेट करू शकतो.

Gratuity Eligibility Rules, Calculation and Income Tax Benefits - Plan Your  Finances
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!