टाटा एआयए लाईफ फॉर्च्युन गॅरंटी पेन्शनमध्ये प्रभावी अपग्रेड

Goan Varta Live | प्रतिनिधी
मुंबई, २७ सप्टेंबर २०२२: भारतातील एक आघाडीची जीवन विमा कंपनी टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्सने (टाटा एआयए लाईफ) टाटा एआयए लाईफ फॉर्च्युन गॅरंटी पेन्शन या आपल्या प्रमुख ऍन्युइटी प्लॅनचे अधिक जास्त प्रभावी व्हर्जन सादर केले आहे. या नवीन व्हर्जनमध्ये काही प्रमुख सुधारणा करण्यात आल्या आहेत, यामध्ये अधिक जास्त ऍन्युइटी दर आणि डेथ बेनिफिट्सचा समावेश आहे. सेवानिवृत्तीच्या सुवर्णकाळाचा आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व निश्चिन्त राहून आनंद घेता यावा यासाठी ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतलाच पाहिजे.
- ऍन्युइटी दरांमध्ये वाढ झाल्याने सेवानिवृत्तीनंतर आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे अधिक सोपे बनणार.
- दुर्दैवाने जर ऍन्युइटंट व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंब सदस्याला आधीपेक्षा खूप जास्त डेथ बेनिफिट मिळणार.

आयुर्मानात झालेली वाढ आणि बचत पातळीमध्ये झालेली घट यामुळे आजच्या काळात देशातील नागरिकांसाठी सेवानिवृत्तीच्या काळातील उत्पन्न चिंतेचे एक प्रमुख कारण बनले आहे. वर्ष २०५० पर्यंत सेवानिवृत्तीच्या काळासाठीच्या बचतीमधील कमतरता ८५ ट्रिलियन यूएस डॉलर्सवर पोहोचेल असा अंदाज आहे. या समस्येला यशस्वीपणे तोंड देता यावे यासाठी भारतीय ग्राहकांनी सेवानिवृत्तीनंतरच्या आपल्या आर्थिक स्वातंत्र्याची पुरेपूर तजवीज करून ठेवली पाहिजे. टाटा एआयए लाईफ फॉर्च्युन गॅरंटी पेन्शन प्लॅनमध्ये अनेक वेगवेगळे, ग्राहकांच्या गरजा, मागण्यांना अनुसरून तयार करण्यात आलेले गॅरंटीड उत्पन्न पर्याय देण्यात आले आहेत. सेवानिवृत्तीनंतरचे आपले आयुष्य चिंतामुक्त असावे यासाठी पुरेशी बचत करण्यात ही योजना ग्राहकांची मदत करते. ही योजना वेगवेगळ्या प्रकारच्या ग्राहकांसाठी उपयुक्त आहे, लग्न होऊन गृहस्थ जीवन जगत असलेले स्त्री-पुरुष जे त्यांची सध्याची जीवनशैली भविष्यात देखील कायम राखू इच्छितात त्यांच्यासाठी देखील ही योजना उपयोगी ठरू शकते. आपल्या जीवनात स्वतःभोवती आर्थिक सुरक्षेचे कवच उभारू इच्छिणाऱ्या लघु मध्यम उद्योजकांसाठी हा अतिशय योग्य पर्याय आहे.

या योजनेतून मिळणारे प्रमुख लाभ पुढीलप्रमाणे आहेत:
तात्काळ लाईफ ऍन्युइटी | फॉर्च्युन गॅरंटी पेन्शन योजनेमध्ये ऍन्युइटंटच्या जीवन कालावधीत निवडण्यात आलेल्या वारंवारितेनुसार तात्काळ ऍन्युइटी पेआउट्स देण्यात येतात. यामध्ये खरेदी किमतीच्या परताव्यासह तात्काळ लाईफ ऍन्युइटी देखील दिली जाते, ज्यामध्ये खरेदीच्या वेळी भरलेली रक्कम डेथ बेनिफिट म्हणून परत केली जाते. |
गॅरंटीड ऍडिशन्सचा पर्याय | डिफरमेंट कालावधीमध्ये दर पॉलिसी महिन्याच्या शेवटी गॅरंटीड ऍडिशन्स जमा केले जातात. |
ऍन्युइटी आधीच निवडण्याचा पर्याय | या पर्यायामुळे तुम्हाला वार्षिक ऍन्युइटी पेआऊट आधीच मिळवता येतात. |
पॉलिसीवर कर्ज घेण्याची सुविधा | पॉलिसी सुरु झाल्यानंतर सहा महिन्यांनी तुम्ही पॉलिसीवर कर्ज मिळवू शकता. जॉईंट लाईफ पर्यायांतर्गत एक पॉलिसीधारक असे कर्ज घेऊ शकतो जे पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास सेकंडरी ऍन्युइटंटच्या नावे होते. |
जॉईंट लाईफ पर्याय | यामध्ये प्रायमरी ऍन्युइटंटला ऍन्युइटी पेआउट्स मिळतात. प्रायमरी ऍन्युइटंटचा मृत्यू झाल्यास सेकंडरी ऍन्युइटंटला (पती/पत्नी/मुलगा/मुलगी/आई/वडील/सासू/सासरे किंवा भावंडं) ऍन्युइटी पेआउट्स मिळतात. |
टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्सचे चीफ फायनान्शियल ऑफिसर श्री. समित उपाध्याय यांनी सांगितले, “सेवानिवृत्ती म्हणजे व्यक्तीच्या जीवनात एका नव्या अध्यायाची सुरुवात. नोकरीव्यवसायातील जबाबदाऱ्यांविषयी चिंता वाटून घेण्याऐवजी स्वतःवर लक्ष केंद्रित करण्यासाठीचा हा उत्तम काळ. सेवानिवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असावे जेणेकरून आपली जीवनशैली आपल्याकडे असलेल्या पैशांवर अवलंबून असणार नाही असे प्रत्येकाला वाटते. सेवानिवृत्तीनंतर आपले सर्व खर्च विनासायास करण्यात उपयुक्त ठरेल असे नियमित गॅरंटीड उत्पन्न देणारी टाटा एआयए लाईफ फॉर्च्युन गॅरंटी पेन्शन योजना हे सेवानिवृत्तीनंतर आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे उत्कृष्ट आर्थिक साधन आहे. या योजनेमुळे आमच्या ग्राहकांना सेवानिवृत्त होण्याआधी पुरेशी बचत करण्यात मदत मिळते आणि जेव्हा पगारातून मिळणारे नियमित उत्पन्न थांबते तेव्हा देखील स्थिर उत्पन्न मिळवता येते.”

सेवानिवृत्तीनंतर आपल्या गरजांना अनुरूप व सुरक्षित उत्पन्न मिळवू इच्छिणारे ग्राहक तसेच आपल्याकडील अतिरिक्त फंड्स एखाद्या गॅरंटीड जीवन बीमा योजनेत गुंतवून आपल्या सेवानिवृत्तीनंतर आपल्या हाती असलेल्या रकमेमध्ये वाढ करू इच्छिणारे सेवानिवृत्त ग्राहक फॉर्च्युन गॅरंटी पेन्शनचा लाभ घेऊ शकतील.
उदाहरणार्थ, डिफर्ड लाईफ ऍन्युइटीमध्ये (जीए-I) आणि खरेदी किंमत परत मिळण्याच्या पर्यायासह जेव्हा ४५ वर्षे वयाचा पुरुष ऍन्युइटंट सात वर्षांसाठी ५ लाख रुपयांचा वार्षिक प्रीमियम भरतो तेव्हा आठव्या वर्षीपासून तो जिवंत असेपर्यंत दरवर्षी २६१०३० रुपयांचे ऍन्युइटी उत्पन्न मिळू लागते. अशाप्रकारे त्याला त्याने भरलेल्या एकूण प्रीमियम रकमेवर ७.४६% वार्षिक उत्पन्न मिळते. ऍन्युइटंटचा जर मृत्यू झाला तर नॉमिनीला देखील डेथ बेनिफिट मिळतात.
या योजनेमध्ये डिफर्ड लाईफ ऍन्युइटी (जीए-II) आणि खरेदी किंमत परत मिळण्याचा अतिशय आकर्षक प्रस्ताव मिळतो. जेव्हा एखादी ५० वर्षे वयाची व्यक्ती नोकरी करत असताना दरवर्षी ५ लाख रुपयांचा वार्षिक प्रीमियम १० वर्षांसाठी भरते तेव्हा त्या व्यक्तीला सेवानिवृत्तीचे वय आल्यावर दरवर्षी ४,०६,१०० रुपयांचे ऍन्युइटी उत्पन्न मिळायला सुरुवात होते.
आधीच्या उदाहरणाप्रमाणे, ऍन्युइटंटचा मृत्यू झाल्यास त्याने भरलेली प्रीमियमची एकूण रक्कम त्याच्या नॉमिनीला परत केली जाते. जॉईंट लाईफ पर्यायामध्ये, समजा की पतीचे वय ४८ वर्षे आणि पत्नीचे वय ४५ वर्षे आहे व ते १२ वर्षांसाठी २ लाख रुपये गुंतवतात तर त्यांना जीवनभर २१२०४० रुपयांची गॅरंटीड वार्षिक ऍन्युइटी मिळेल. त्यांचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला २४ लाख रुपये मिळतील.