इंडियन बँक्स असोसिएशनच्या ‘या’ निर्णयामुळे होतील कर्मचारी आणि ग्राहक दोघेही खुश, जाणून घ्या काय आहे हा मास्टर प्लॅन?
बँक कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर : बँक कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. इंडियन बँक्स असोसिएशनने 5 वीक वर्किंग डे चा विचार करीत आहे . पण त्यामुळे ग्राहकांची समस्या कशा काय सुटणार? जाणून घ्या संपूर्ण बातमी.

ऋषभ | प्रतिनिधी

बँक कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा आणि दोन दिवस सुट्टीचा विचार करत आहे. अनेक दिवसांपासून बँक कर्मचारी ही मागणी करत आहेत. अहवालात दावा करण्यात आला आहे की 5 दिवसांच्या कामाच्या आठवड्यात दररोज 50 मिनिटांनी कामाचे तास वाढवता येतात. IBA आणि युनायटेड फोरम ऑफ बँक एम्प्लॉईज (UFBE) यांच्यात या विषयावर चर्चा सुरू आहे आणि संघटनेने 5 दिवसांच्या कामकाजाच्या आठवड्यासाठी तत्त्वतः सहमती दर्शविली आहे. अंतिम निर्णय अद्याप आलेला नाही. तर जाणून घेऊ काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

या निर्णयाने कर्मचारी आणि ग्राहक दोघांचेही प्रश्न मार्गी लागतील, पण कसे ?
ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशनचे सरचिटणीस एस नागराजन यांनी एका मीडिया वेबसाइटला सांगितले की, सरकारला निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्याच्या कलम 25 अंतर्गत सर्व शनिवार सुटी म्हणून सूचित करावे लागतील. बँक कर्मचारी सध्या पर्यायी शनिवारी काम करतात. कर्मचाऱ्यांना दररोज सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.३० या वेळेत ४० ते ५० मिनिटे जादा काम करावे लागणार आहे. या निर्णयामुळे ग्राहकांचा संभ्रमही दूर होणार आहे आहे कारण दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असूनही अनावधानाने अनेकवेळा ते बँकेत पोहोचायचे. शनिवार आणि रविवार सुट्टी जाहीर केल्यास ग्राहक त्यानुसार त्यांचे वेळापत्रक ठरवतील.

मार्च 2023 मध्ये बँक सुट्ट्या
बँक कर्मचारी आणि बँक ग्राहकांना हे माहित असणे आवश्यक आहे की मार्च 2023 मध्ये, बँका 2रा आणि 4था शनिवार आणि रविवारसह 12 दिवस बंद राहतील. काही बँक सुट्ट्या देशभरात पाळल्या जातील, तर काही स्थानिक सुट्ट्या असतील. सर्व बँका सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी बंद असतात, तर काही बँका प्रादेशिक सण आणि सुट्टी साजरे करतात. मार्च 2023 मध्ये साजरे होणार्या सणांमध्ये होळी, चैत्र नवरात्री, राम नवमी आणि बरेच काही समाविष्ट आहे.