मूर्तीमंत चैतन्य… ज्ञानाचा खजिना ‘भाई खलप’

वयाची 75 पूर्ण; अविस्मरणीय आणि अद्भूतपूर्व कार्यकर्तृत्वाला सलाम

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः गोव्याच्या राजकारणात आमदार, मंत्री, विरोधी पक्षनेते आणि उपमुख्यमंत्री या नात्याने प्रदीर्घ काळ अ‍ॅड. रमाकांत खलप अविरतपणे वावरले आणि आपला ठसा उमटविला. पण केवळ गोव्याच्या हितापुरता विचार न करता व्यापकदृष्ट्या देशहिताचा विचार ते निरंतर करतात, म्हणूनच नियतिने त्यांना राष्ट्रीय राजकारणात नेलं.

हेही वाचाः ‘मांद्रे ऑफ कॉलेज’ला एकाच टप्प्यात अनुदान देणार

प्रचंड इच्छाशक्ती, योग्यता आणि आत्मविश्वास या गुणांच्या बळावर ते केद्रींयमंत्री मंडळात कायदामंत्री झाले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या समाजमनक तज्ञावंताने जे पद भूषवलं, त्या पदावर राहून महत्त्वपूर्ण कार्य करण्याची संधी त्यांना मिळाली. गोवा विधानसभेतील आमदारपासून केंद्रिय कायदामंत्री पदापर्यंत त्यांनी केलेला प्रवास दैदीष्यमान स्वरूपाचा मानावा लागेल. केंद्रिय मंत्रीपदापर्यंत पोहचले असतानासुद्धा ज्या मतदारसंघातून आपली राजकीय कारकीर्द सुरू झाली, त्या मांद्रे मतदारसंघाकडे अजूनही आपलं आपुलकीचं नातं आणि नाळ शिल्लक ठेवून, समाजकार्यासाठी धडपडणाऱ्या रमाकांत खलप उर्फ भाई यांचा दिनांक ५ ऑगस्ट २०२१ रोजी वयाची पंच्याहत्तरी साजरी केली.

हेही वाचाः ‘नायका’ने सेबीकडे डीआरएचपी दाखल केले

गोव्याचे भाग्यविधाते आणि पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांचं १२ ऑगस्ट १९७३ रोजी निधन झालं आणि म.गो. पक्षाच्या पराक्रमाचं पहिलं पर्व संपलं अशी बातमी गोमंतकातील समाजमाध्यापर्यंत पोहचत असताना, मांद्रे मतदारसंघातून झालेल्या पोटनिवडणूकीत अ‍ॅड. रमाकांत खलप यांनी म.गो.पक्षाने उमेदवारी दिली. आणि रमाकांत खलप प्रचंड बहुमताने निवडून आले. इतकंच नव्हे तर आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर आणि सहकाऱ्यांनी दाखविलेल्या आत्मविश्वावर अखिल गोमंतकात आपल्या नेतृत्वाची चूणूक दाखवली. शिवाय कठीण प्रसंगात म.गो. पक्षाची धुरा आपल्या खांद्यावर झेलली.

हेही वाचाः ऑनलाईन, केवायसी फसवणुकीला बळी पडू नका

आमदार बनल्यापासून पेडणे तालुक्यातील ग्रामीण भागात भेटी देऊन, निरनिराळ्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. मांद्रे मतदारसंघातीलच नव्हे, तर पेडणे तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व घटकांना शिक्षण सुविधा मिळाव्या म्हणून पेडणे तालुका विकास परिषद नावाची संस्था सुरू केली. १९७६ त्या काळात संस्थेच्या वतीने मांद्रे आणि वारखंड गावात संस्थेची हायस्कूल्स सुरू केली. आपल्या राजकीय कारकीर्दीत कुणाशीही सुड बुद्धीने न वागता तालुक्यात निरनिराळ्या सोयी सुरू केल्या. अनेक तरूणांना नोकरी आणि व्यवसाय मिळवून दिला. १९८०च्या निवडणूकीत म.गो.पक्ष हरला आणि म.गो.ची. राजवट संपुष्टात आली. मात्र याच कठीण काळात अ‍ॅड. रमाकांत खलप यांनी विरोधकांशी जोरदार टक्कर देत, आपला विजय संपादन केला आणि सतत तिसऱ्यांदा आमदार बनले.

हेही वाचाः फ्लॅटमधून ८० हजारांचा मुद्देमाल लंपास

२२ मार्च १९८० रोजी साै. शशिकला काकोडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन म.गो.पक्ष विलीन करण्याचं जाहीर केलं. त्याचवेळी एम.एस. प्रभू, बाबन नाईक, मुंकूद शिक्रे, वसंत जोशी यांच्या मार्गदर्शनानुसार आणि बाबुसो गांवकर यांच्या सहकार्याने म.गो.पक्ष जिवंत ठेवत म.गो. पक्षाचं अस्तीत्व त्यांनी टिकून ठेवलं. १९८९ च्या निवडणुकीपूर्वी गोव्यात झालेल्या भाषिक चळावळीतही अ‍ॅड. रमाकांत खलप यांनी मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी आपल्या छातीची ढाल करून, अनेक प्रहार सहन केले. मात्र कधीही आपलं मोठेपण आणि आपण केलेल्या कार्याची स्तुती त्यांनी स्वत: करून घेतली नाही हे विशेष.

हेही वाचाः फंडपेटी फोडल्याप्रकरणी एकाला अटक

१९९४ मध्ये झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत अ‍ॅड. रमाकांत खलप यांचा पराभव झाला. भावी मुख्यमंत्री म्हणून भाईंना पक्षाने पुरस्कृत केलं होतं. परिणामी रमाकांत खलप यांच्या अंतर्गत प्रतिस्पर्धी गटाने त्याचा पराभव करण्यास अथक परिश्रम घेतले. मात्र या पराभवाने खचून न जाता गोव्यातील जनतेशी सतत संपर्क ठेवत, सहानभुती मिळविली. तद्नंतर झालेल्या लोकसभा निवडणूकीत म.गो. पक्षाचे उमेदवार म्हणून उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आणि राष्ट्रीय राजकारणात गेले. ११ व्या लोकसभेच्या निवडणूकीत जनतेनं सगळ्याच पक्षांना हात दाखवला. भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रपतींनी अटल बिहारी वाजपेयींना पंतप्रधानपदाची जबाबदारी दिली आणि त्यांना पायउतार व्हावं लागलं.

नंतर संयुक्त मोर्चाचे नेते म्हणून कर्नाटकाचे मुख्यमंत्री एच.डी. देवगौडा यांची निवड झाली. अठरा पक्षाची मोट बांधून सरकार स्थापन झालं. या सरकारात मंत्री होण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असताना, गोंयकारांचा ज्येष्ठ भ्राता आणि रमाकांत खलपांना आपल्या छोट्या बंधुप्रमाणे मान सन्मान देणारा आणि आपुलकीने वागणारा देशाच्या राजकारणातील महत्त्वपूर्ण नेता मा. शरदरावजी पवार यांच्या प्रयत्नामुळे अ‍ॅड. रमाकांत खलप नामक मराठी माणसाची केंद्रीय कायदामंत्री म्हणून निवड झाली. अ‍ॅड. रमाकांत खलप यांची अठरा महिन्यांची कारकीर्द अनेक अर्थाने गाजली, नव्हे गाजवली.

हेही वाचाः जगाला थक्क करणारी ‘मेडल मशिन्स’

गोव्यातील राजकीय पटलावर १९८९ मध्ये म. गो. पक्षाचे अठरा आमदार सोबत असताना मुख्यमंत्री म्हणून विराजमान होण्याची चालून आलेली संधी अंतर्गत विरोधाभासामुळे गेली. चर्चील आलेमांव यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्यास विरोध करणारे रमाकांत खलप म्हणाले होते, ‘म.गो. पक्षाचे आमदार फुटले तरी चालतील. मात्र चर्चील आलेमावच्या नेतृत्वाखाली पुरोगामी लोकशाही आघाडीचं सरकार बनवण्यास आपल्याला उमेद नाही. तुम्हाला पाहिजे ते करा’ म्हणून खलप मात्र अस्वस्थ झाले. मात्र यावेळी अनेक राजकीय घडामोडी घडत असताना दै. गोमंतकचे संपादक नारायण आठवले यांनी भाईंची भेट घेऊन त्यांची समजूत काढली. त्यांच्याच सांगण्यावरून डॉ. लुईस प्रोत बाबोझ यांना मुख्यमंत्री बनवण्यास भाई खलपांनी तयारी दर्शवली. सरकार मात्र अल्पावधीतच कोसळलं. २५ जानेवारी १९९१ रोजी गोव्याचे सहावे मुख्यमंत्री म्हणून रवी नाईक यांचा शपथविधी झाला. मात्र भाई खलप निरुत्साह झाले नाहीत. त्यांनी अन्यायाविरुद्ध लढा देण्याचं चालुच ठेवलं.

हेही वाचाः ‘ईडी’ची फ्लिपकार्टला नोटीस ; 10,600 कोटींचा ठोठावला दंड

रवी नाईक यांच्या मंत्रिमंडळात सामील झालेल्या अशोक साळगावकर आणि शंकर साळगावकर यांनी अधिकृतपणे चुकीच्या योजना आणण्यास सुरुवात केली. शंकर साळगावकर महसुलमंत्री असताना मोपा पठारावर बॉक्साईट खाणी सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र सदर निर्णयाला कडाडून विरोध करून, रमाकांत खलपांना राज्यभर आपल्या सहकाऱ्यांसमवेत मोपा पठाराची पाहणी केली. सदर प्रकल्पाला विरोध करण्यासाठी तरुण कार्यकर्त्यांची फौज तयार केली. सदर प्रकल्प रद्द करून यशस्वी ठरले. म्हापसा येथे हाऊसिंग बोर्ड वसाहतीत गणेशमंदिराची जागा स्वत:साठी ताब्यात घेण्याचा प्रयत्न मंत्री अशोक साळगावकर यांनी केला. मात्र सदर वसाहतीतील लोकांच्या भावनांची कदर करत सदर गोष्टीला विरोध केला. प्रचंड जन समुदाय आणि गणेश भक्तांच्या झालेल्या जाहीर सभेत आपल्या रक्ताचे पाट वाहाले तरी चालतील. पण गणेश मंदिर उभारलंच पाहिजे, अशी सिंहगर्जना करून, गणेश मंदिर उभारणीतील अडथळे दूर केले. साहित्य, कला, संस्कृती, विज्ञान, तंत्रज्ञान आणि अर्थकारण या क्षेत्रातील प्रज्ञावंतांना सहवास भाईंना मिळाला म्हणून आज रमाकांत खलप म्हणजे मूर्तीमंत चैतन्य असल्यासारखं सर्वांना वाटतंय. काहींना तर भाई खलप म्हणजे ज्ञानाचा खजिना (Treasure of the knowledge) वाटत आहे.

हेही वाचाः परवानगी न दिल्यास साखळी उपोषण करू

रमाकांत खलप यांनी गोव्यात आणि गोव्याच्या बाहेर अनेक माणसं जोडली. पण केवळ राजकारणी व लोकनेता म्हणून वावरल्यामुळे त्यांनी हा लोकसंग्रह केलेला नाही. हा झरा मूळचाच आहे. त्यांच्याकडे हृदय श्रीमंती आहे. दीन-दलित, शेतकरीवर्ग, कपटकरी वर्ग यांच्याविषयी अपार कणव त्यांच्या अंत:करणात आहे. म्हणूनच जनमानस त्यांच्याकडे ओढले जातात. आज गोव्याच्या कुठल्याही तालुक्यात किंवा ग्रामीण भागात जरी गेलो, तरी सर्व लोकांना ‘तुम्हीच माझे सांगाती’ असल्याचा विश्वास निर्माण करतात.

हेही वाचाः गोवा बागायतदारातील सामान आता वॉट्सअपवर ऑर्डर करा

आपण वयाची ७५ वी पूर्ण करत असताना आपल्या अविस्मरणीय आणि अद्भूतपूर्व कार्यकर्तृत्वाने प्रभावित झालेलो आम्ही, तुमची लोकसेवा अशीच चालू राहो, आपल्या हृदयात खोलवर निंबलेला गोमंतकीयाबद्दल अभिमान, उत्सुकता, जिद्द आणि विश्वास यांना कोणतंही गालबोट न लागो आणि आपली अधुरी राहिलेली स्वप्नं साकार होवोत हीच श्री शांतादुर्गादेवी आणि श्री सप्तेश्वर यांच्या चरणी प्रार्थना.

-सखाराम (विजय) परब
वारखंड, पेडणे- गोवा
९९६०३८५६८१

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!