माध्यम युध्द

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

  • दीपक पाटील, जर्नालिस्ट आणि सोशल मिडिया एक्स्पर्ट

सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरण देशातील सर्वात रहस्यमय घटना बनत चालले आहे. या निमित्ताने राज्या राज्यांमधील, राजकीय पक्षांमधील, तपास यंत्रणांमधील संघर्ष पहायला मिळत असताना नॅशनल मिडियामध्येही उभी दरी पडली आहे. गेल्या आठवड्यापर्यंत एनडीटीव्ही वगळता सर्व न्यूज चॅनेल्सचे रिपोर्टिंग प्रो सुशांतसिंग राजपूत फॅमिली आणि फॅन्स या प्रकारचे होते. या प्रकरणात रिया चक्रवर्तीचे मिडियाकडून जोरदार ग्रिलींग केले जात होते. त्यामुळे हिंदी फिल्म इंडस्ट्री आणि महाराष्ट्र सरकारमधील रियाच्या हितचिंतकांनी गेल्या आठवड्यात ही मिडिया ट्रायल रोखण्यासाठी एक प्लॅन आखला. त्यासाठी नेहमीच्या पी. आर. एजन्सीची मदत घेउन राष्ट्रीय पातळीवरील न्यूज चॅनेल्सना मॅनेज करण्याचा निर्णय घेण्यात आला. (आता हे मॅनेज करणे म्हणजे काय? हे वेगळे सांगण्याची गरज नाही.) त्यामुळे गेल्या तीन-चार दिवसांपासून इंडिया टुडे आज तक ग्रुपचे सर्व चॅनेल्स, एबीपी ग्रुपचे सर्व चॅनेल्स रियाची बाजू सावरता येईल आणि सुशांत आणि त्याच्या कुटुंबावरच चिखलफेक करता येईल असे रिपोर्टिंग करु लागलेत. काल राजदीप सरदेसाईकडून आज तकसाठी रियाची प्रतिमा उजळवण्याचा प्रयत्न करणारा घेण्यात आलेला इंटरव्ह्यू त्याच पीआर स्ट्रॅटिजीचा भाग आहे. या इंटरव्ह्यूनंतर नॅशनल मिडियामध्ये प्रो रिया आणि अँटी रिया असे दोन अनधिकृत गट तयार झालेेत. सुशांतचे कुटुंब आणि फॅन्सच्या बाजूला रिपब्लिक, टाईम्स, इंडिया टीव्ही, न्यूज नेशन, झी न्यूज, न्यूज १८, टीव्ही ९ तर टिम रियाच्या बाजूने इंडिया टुडे, एबीपी आणि अपेक्षेप्रमाणे एनडीटीव्ही आहेत. अर्थातच सोशल मिडियावर सुशांतच्या प्रचंड फॅन फॉलोअर्समुळे रिपब्लिक, टाईम्स, इंडिया टीव्ही, झी न्यूज, न्यूज नेशनचे पत्रकार हिरो तर इंडिया टुडे, एबीपी आणि एनडीटीव्हीचे पत्रकार खलनायक बनत आहेत. टिम रियाच्या पीआर अजेंडाला सोशल मिडियाला अत्यल्प प्रतिसाद मिळतोय. रिपब्लिक मिडियाच्या इंग्लिशनंतर हिंदी न्यूज चॅनेलनेही आज तकला टीआरपी मध्ये मागे टाकल्यामुळे त्यांच्यातील मिडिया रायव्हलरी प्रचंड वाढली आहे. अर्णब गोस्वामी आज तक चॅनेलबरोबरच राजदीप सरदेसाईचा आपल्या खास शैलीत जोरदार समाचार घेत आहे. एकूणच सुशांतसिंग प्रकरण तपास यंत्रणांसोबतच नॅशनल मिडियानेही प्रतिष्ठेचे बनवले आहे. या प्रकरणाचे एकूण गांभीर्य मराठी न्यूज चॅनेल्सच्या दरबारी संपादकांच्या बुध्दीच्या पलीकडचे असल्यामुळे त्यांच्या या प्रकरणातील पेड न्यूज केविलवाण्या आणि अदखलपात्र बनत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!