Happy Birthday अमित शहा! तडीपार ते होममिनिस्टर, वाचा अमित शहांचा चढता राजकीय आलेख

अब तक 56 नॉट आऊट!

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : आज अमित शहांचा वाढदिवस. आजचा वाढदिवस शहांसाठीचा काहीस खास. नाना पाटेकरचा अब तक छप्पन पाहिला असेलच तुम्ही. आज अमित शहांचा छप्पनावा वाढदिवस आहे. नानाचा पिक्चर आणि अमित शहांचा बर्थडे यांचा काडीमात्र संबंध नसला, तरिही 56 वाढदिवस साजरा करणं अमित शहांसाठी काहीसं खासच असणार आहे.

पहिल्यांदा तर अमित शहांना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.. अमित शहांना राजकारणातला चाणक्य म्हटलं जातं. भाजपने गेल्या सर्व निवडणुकांमध्ये कमावलेल्या यशामागे मोदी-शहा जोडीचा मोठा हात आहे. त्यातला एक महत्त्वाचा चेहरा म्हणून अमित शहांच्या कारकिर्दीकडे पाहणं क्रमप्राप्त आहे.

मागच्या एका वर्षात अमित शहांसाठी फार महत्त्वाचं होतं. आजारपणाने त्यांना वेढलं होतं. त्यात त्यांना कोरोनाही झाला. त्यातून ते बरे झाले. त्यानंतर पुन्हा काही काळ रुग्णालयात होते. या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या त्यांची प्रकृती एकदम ठणठणीत असल्याचं सांगितलं जातंय. त्यांनी ठणठणीत असणं म्हणजे भाजपने ठणठणीत असल्याचं आहे, असं राजकीय जाणकार म्हणतात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आयुष्याचा प्रवास कसा होता, हे जाणून घेवूयात.

मुंबईकर अमित शहा

अमित शहांचा जन्म मुंबईत झाला. गुजरातमध्ये त्यांचं बालपण आणि आयुष्य गेलं असलं, तरी स्वप्नांच्या नगरीतच अमित शहा जन्माला आले. २२ ऑक्टोबर १९६४ साली अमित शहांचा जन्म मुंबईमध्ये झाला. एका वैभवसंपन्न वैष्णव कुटुंबात अमित शहा जन्माला आले. अमित शहांच्या जन्मानंतर त्यांचे आजोबा मुंबईहून गुजरातला शिफ्ट झाले.

Posted by Amit Shah on Sunday, 27 September 2020

ट्रॅडिशनल शहा

गुजरातच्या पेतृक गावात अमित शहा यांचं बालपण गेलं. अमित शहांचं शिक्षण पारंपारिक पद्धतीने व्हावं, अशी त्यांच्या आजोबांची इच्छा होती.

स्टॉक ब्रोकर ते पॉलिटिक्स

वयाच्या चौथ्या वर्षी अमित शहा चक्क सकाळी 4 वाजता उठायचे. सकाळी 4 वाजता उठून अमित शहा आचार्य शास्त्रींकडून परंपरागत शिक्षण घेत होते. मोठं झाल्यानंतर अमित शहा शेअर बाजारात काम करायचे. पेशाने अमित शहा स्टॉक ब्रोकर होते. अमित शहांचा राजकीय प्रवास नेमका कसा झाला आणि गृहमंत्री होईपर्यंतचा त्यांचा प्रवास काय आहे, त्यावरही एक नजर टाकुयात..

Posted by Amit Shah on Saturday, 17 October 2020

…असा आहे अमित शहांचा राजकीय प्रवास

1987 – भाजपात प्रवेश केला. युवा नेता मोर्चाचे ते सदस्य बनले.

1991 – लालकृष्ण आडवाणींच्या मतदारसंघात प्रचाराची जबाबदारी अमित शहांवर सोपवण्यात आली

1996 – अटल बिहारी वाजपेयींच्या प्रचाराची जबाबदारी शहांवर सोपवण्यात आली.

1997 – अमित शहांनी पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक लढवली. सरखेजमधून अमित शहा आमदार म्हणून निवडूनही आले.

1997- पोटनिवडणुकीपासून, 1998, 2002 आणि 2007मध्ये अमित शहा सातत्यानं आमदार म्हणून निवडणून येत राहिले.

2003 ते 2014 – गुजरात राज्याच्या कॅबिनेटमध्ये गृहमंत्रीपद अमित शहांनी भूषवलं.

Posted by Amit Shah on Thursday, 17 September 2020

2009 – गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी अमित शहांची निवड करण्यात आली.

2 जुलै, 2010 – सोहराबुद्दीन फेक एन्काऊरप्रकरणी अमित शहांना अटक करण्यात आली. मात्र पुरेसे पुरावे नसल्याकारणानं अमित शहांची सुटका करण्यात आली. त्यानंतर काही काळ अमित शहा तडीपार देखील होते, अशी माहिती मिळते. इतकंच काय, तर तडीपार असतानाही अमित शहा भाजपच्या प्रचाराता दिसले होते, अशाही काही बातम्या समोर येतात.

2013 – अमित शहांना उत्तर प्रदेश भाजपचे प्रभारी बनवण्यात आलं. अमित शहांना प्रभारी बनवल्यानंतर भाजपने घवघवीत यश उत्तर प्रदेशात मिळवलं. ज्या उत्तर प्रदेशात २०१४ आधी भाजपच्या फक्त १० जागा होत्या, तिथे अमित शहांच्या नेतृत्त्वात भाजपने तब्बल ७१ जागी कमळ फुलवलं. त्यांच्या या यशामुळे नंतर अमित शहांकडे भाजपच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली.

2014 – नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्यामुळे यांच्या जागी गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कुणाला द्यायचं हा प्रश्न होता.. अखेर गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदीही अमित शहांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

2019 – गांधीनगरमधून लोकसभा निवडणूक अमित शहांनी लढवली. आणि जिंकली देखील.

2019 – मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये अमित शहांना गृहमंत्री पद

Posted by Amit Shah on Thursday, 8 October 2020

हेही वाचा –

केंद्रीय कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर, राज्यसरकारी कर्मचाऱ्यांचं काय?

पर्वरी ATM चोरी प्रकरण : तिघांना दिल्लीतून पकडलं, मुख्य आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळला

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!