सतत, अविरत चलना है!

स्वयंसेवकाने निसंकोचपणे मान्य केलेलं हे एक शाश्वत सत्य

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः संघ कामाप्रती प्रत्येक स्वयंसेवकाने निसंकोचपणे मान्य केलेलं हे एक शाश्वत सत्य आहे. समाजावर आणि समाजात जेव्हा जेव्हा विपदा आली तेव्हा तेव्हा “सेवा परमो धर्म:”  म्हणून संघ आणि स्वयंसेवकांनी छातीठोक तिचा सामना केला.

हेही वाचाः बुधवारपर्यंत मुसळधार; सतर्क राहण्याच्या नागरिकांना सूचना

गेलं दीड वर्षं कोरोना महामारीने जगभरात जे तांडव घातलं याची कल्पना सर्वांना आहे. पण त्याचबरोबर आम्हा सर्वांना याच काळात समाजाचं एक संगठीत रूप बघायला मिळालं.  मुळात संघ हे समाजाचंच संगठन असल्यानं या प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा स्वयंसेवकांनी पुढे येऊन समाजात त्या वेळी गरज असलेलं सहस्त्र हत्तींचं बळ पुरवलं. कळंगुट येथे सुरू असलेलं कोविड विलागिकरण केंद्र हे याच शक्तीचं एक सूक्ष्म स्वरूप आहे.

हेही वाचाः कोविडमुक्तीनंतर किमान ४५ दिवस विश्रांती हवी

एकूण ५० रुग्णांना सेवा प्रदान करण्याची क्षमता असलेल्या या केंद्रात जशी जशी संसर्गाची गती कमी होत आहे तशीच रुग्णांची संख्या कमी होऊन निरोगी आणि बरे होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे.  इथे पूर्ण वेळ उपस्थित असलेल्या ३ डॉक्टर्स आणि एक परिचारिका रुग्णांची काळजी घेत आहेत.  प्रत्येक रुग्णाला वेगवेगळ्या विलागिकरण खोल्यात ठेवून दिवसातून ३ वेळा त्यांचं ऑक्सिजन प्रमाण, तापमान आणि तब्येतीची देखरेख केली जाते. आरोग्य कर्मचाऱ्यां सोबत व्यवस्था म्हणून इथे पूर्ण वेळ असलेले स्वयंसेवक योग्य ती काळजी आणि दक्षता घेऊन त्यांना सहकार्य करत आहे.

हेही वाचाः संरक्षक भिंत कोसळून ७ गाड्यांची हानी

सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत, ठरलेल्या वेळापत्रकानुसार या केंद्राचं कामकाज चालतं.  सकाळी सर्व रुग्णांना वॉट्सॲपवर योग घेतला जातो. नंतर नाश्ता, दुपारी जेवण संध्याकाळी चहा आणि रात्रीचं जेवण त्यांना त्यांच्या खोलीपर्यंत पोचवलं जातं. हे करताना व्यवस्था विभाग पीपीई किट घालून योग्य काळजी घेऊन हे काम करतात. प्रत्येक व्यवस्था विभागातील स्वयंसेवक दिवसातून १ ते २ वेळा त्यांना दिलेल्या रुग्णांना फोन करून त्यांची विचारपूस करून तसंच त्यांना सकारात्मक व्हिडिओ आणि ऑडियो पाठवून त्यांच्यातील मनोबल वाढवतात.

हेही वाचाः CRIME | माजोर्डा येथे मजुराचा खून

संघाचे उत्तर गोवा महाविद्यालयीन प्रमुख स्वप्नील गावकर आणि पणजी नगर कार्यकर्ता आकाश कापडी यांच्या मार्गदर्शनाखाली इथली व्यवस्था चालते. ‘अभाविप’चे प्रांत सह मंत्री प्रभा नाईक, उत्तर गोवा संघटन मंत्री शंकर संगपाळ बरोबरच ‘अभाविप’चे इतर कार्यकर्तेसुद्धा पूर्ण वेळ इथे काम करताहेत. व्यवस्था म्हणून असलेले सर्व स्वयंसेवक निरोगी राहावे म्हणून त्यांना सकाळी योग, योग्य आहार तसंच रोगप्रतिकार शक्ती वाढावी म्हणून काढा सारख्या इतर गोष्टी दिल्या जातात.

हेही वाचाः तीन अर्भकांचा तपास अजूनही गुलदस्त्यात

व्यवस्था करणाऱ्यांचा गट दर १० दिवसांनी बदलतो.  सध्या इथे दुसरा गट रुग्णसेवेसाठी कार्यरत आहे.  पण गट आणि व्यक्ती बदलली म्हणून कामाची गती, अचूकता आणि समर्पण भाव तिळमात्र बदलत किंवा ढळत नाही. कुणीही वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसिक नसताना अल्प काळात कोविड रुग्णांना सेवा देण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी शिकून आत्मसात करून आणि स्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन कार्यतत्परतेचे एक उदाहरण हे विलगिकरण केंद्र समाजासमोर ठेवत आहे.

हेही वाचाः …अन् फुटबॉलच्या मैदानावरच एरिक्सननं जिंकला ‘गेम ऑफ लाईफ ‘

अत्यंत मनमिळावू स्वभाव आणि समाजाप्रती सेवा भाव सर्व स्वयंसेवकांचा गुणच आहे आणि हाच गुण सर्वांना एकत्र आणतो.  मग सर्वांसोबत मजा मस्ती करणं, रात्रीच्या चांदण्यात गाणी म्हणण्याचा कार्यक्रम, एकत्र भोजन आणि चहा नाश्ता आणि रोज संध्याकाळी क्रिकेटचा खेळ म्हणजे सर्वासाठी शिण भागवण्याचा क्षण. पण त्याचबरोबर प्रत्येक दिवसाची सुरुवात आणि शेवट हा ‘त्वदीयाय कार्याय बध्दा कटीयम्’ अशी समाज आणि देशाप्रती भावना ठेवूनच होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!