द डार्क वेब

अर्जुन धस्के | प्रतिनिधी
सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाचे गुढ उकलण्यात सीबीआयला अजूनपर्यंत यश आले नसले तरी त्याबाबत अजूनही नवनवीन कॉन्स्पीरन्सी थिअरीज पुढे येत आहेत. परवा दिल्लीतील एका नामांकीत वकिलाने एका ट्विटद्वारे आणखी एक खळबळजनक थिअरी मांडली.
त्याने सांगितले की सुशांतसिंग राजपूतची आत्महत्या नसून त्याचा खून करण्यात आला आहे. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे या खुनाचे डार्क वेबवर लाईव ब्रॉडकास्ट करण्यात आले होते. जे थेट प्रसारण फिल्म इंडस्ट्रीतील अनेक लोकांनी पाहिले.
ही बातमी मेनस्ट्रीम मिडियामध्ये आली नसली तरी यूट्यूबवर या विषयीचे रिपोर्टस लाखो लोकांनी पाहिले आहेत. हा दावा खरा की खोटा ते सीबीआय तपासात स्पष्ट होईलच परंतु या निमित्ताने डार्क वेबविषयी कुतुहल निर्माण होत आहे.
वर्ल्ड वाईड वेबचे तीन भाग असतात, सरफेस वेब, डीप वेब आणि डार्क वेब. आपण जे दैनंदिन व्यवहारात वापरतो त्या वेबसाईट्स सरफेस वेबचा भाग आहे. डीप वेबमध्रे मेडिकल रिपोर्टस, सरकारी विभागांचा डेटा, कायदेशीर कागदपत्रे, आर्थिक तसेच वैज्ञानिक रिपोर्टस असतात. ज्याचा अॅक्सेस अधिकृत व्यक्तींनाच मिळतो. डार्क वेब म्हणजे इंटरनेट म्हणजेच वर्ल्ड वाईड वेबचाच एक लपलेला भाग आहे. ज्याचा अॅक्सेस प्रत्येकासाठी उपलब्ध होत नाही.
त्यासाठी खास सॉफ्टवेअर्स आणि टूल्सची आवश्यकता असते. त्यानंतरच सामान्य ब्राउजरद्वारे सामान्य वेबप्रमाणे डार्क वेबवरील सिक्रेट वेबसाईट्स आणि सेवांचा लाभ घेता येतो. तरीही त्यामध्येही काही वेबसाईट्स हिडन असतात.
डार्क वेबचा वापर प्रामुख्याने जगभरातील टेक्नोसॅव्ही गुन्हेगारांकडून तसेच दहशतवादी संघटनांकडून केला जातो. ड्रग्ज, शस्त्रांस्त्रांची तस्करी यांचे व्यवहार करण्यासाठी डार्क वेबवरील ईमेल सेवा आणि बिटकॉईन क्रिप्टोकरन्सीचा वापर होतो. डार्क वेबवर अॅसानेशन मार्केट हा प्रकारही लोकप्रिय आहे. अॅसानेशन शो हा प्रकार अनेक इंग्लिश फिल्ममध्ये तुम्ही पाहिला असेल.
यामध्ये लोकांना अधिकाधिक वेदना देउन ठार करण्यात येते. ज्याचे लाईव ब्रॉडकास्ट जगभरात लाखो विकृत मनोवृत्तीच्या लोकांच्यापर्यंत पोहोचवले जाते. हे सगळेच गोपनीय पध्दतीने होत असल्यामुळे संबंधीतांपर्यंत पोलीस, तपास यंत्रणा, सरकारी संस्था यांचे हातही पोहचण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशाच एका व्हिडिओ वेबसाईटवर सुशांतच्या खुनाचे थेट प्रसारण केले असल्याचे त्या वकिलाने सांगितले आहे.
हे लाईव ब्रॉडकास्ट डाउनलोड किंवा सेव करता येत नसल्यामुळे त्याचे कोणतेही पुरावे मागे उरत नाहीत. डार्क वेबमधील लूप होल्स शोधण्यासाठी जगभरातील तपास यंत्रणा प्रयत्न करीत आहेत.
– दीपक ज. पाटील
#inforpassion See less