ग्लोबल वार्ता : संयुक्त अरब अमिरात आणि भारताची अमेरीकन डॉलरला टांग; आता ‘बिजनेस’ रुपया-दीरहममध्ये

Goan Varta Live | प्रतिनिधी
वेबडेस्क 17 जुलै : भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांनी नुकताच एक सामंजस्य करार केला आहे जो डॉलरऐवजी रुपयामध्ये व्यापार सेटलमेंटचा पाठपुरावा करतो, ज्यामुळे व्यवहार खर्च कमी होईल आणि डॉलरच्या कॉन्वरसेशनची गरज नाहीशी होईल. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या UAE दौऱ्यादरम्यान हा करार झाला होता. याव्यतिरिक्त, दोन्ही राष्ट्रांनी क्रॉस बॉर्डर मनी ट्रान्सफर ईजी करण्यासाठी रिअल-टाइम पेमेंट लिंक प्रस्थापित करण्याचे मान्य केले आहे.

शनिवारी भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या निवेदनानुसार, दोन्ही करार “स्मूथ क्रॉस-बॉर्डर व्यवहार आणि पेमेंटमधील वाढीव आर्थिक सहकार्यास प्रोत्साहन देतील.” तेलाचा जगातील तिसरा सर्वात मोठा आयातदार आणि ग्राहक म्हणून भारत हा यूएईकडे तेलासाठी डॉलरमध्ये सद्यस्थीतीस सौदा करत आहे.
तथापि, भारतीय मध्यवर्ती बँकेने रुपयामध्ये जागतिक व्यापार सेटलमेंटसाठी अलीकडील फ्रेमवर्क स्थापित केल्यामुळे, या करारामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापारासाठी भारतीय चलन वापरण्याकडे वळण्याची परवानगी मिळेल. एप्रिल 2022 ते मार्च 2023 या कालावधीत भारत आणि UAE मधील एकूण द्विपक्षीय व्यापार $84.5 अब्ज इतका होता.

अहवालानुसार, कराराशी परिचित असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, भारत UAE तील ‘अबू धाबी नॅशनल ऑइल कंपनी (ADNOC) ला तेलाचे पहिले पेमेंट रुपयांमध्ये येणाऱ्या काळात सुरू करू शकतो.
याव्यतिरिक्त, भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केले आहे की दोन्ही देशांच्या मध्यवर्ती बँकांनी भारताच्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) आणि UAE चे इन्स्टंट पेमेंट प्लॅटफॉर्म (IPP) यांच्यात कनेक्शन स्थापित करण्यास सहमती दर्शविली आहे. हे कनेक्शन आशियाच्या एवर ग्रोइंग ट्रेंडचे अनुसरण करते, आशिया खंडात यापूर्वी देखील असेच करार झाले आहे, ज्यामुळे देश कोट्यवधी रुपयांच्या वायफळ उलाढालीपासून वाचलेला आहे.
